Monday, May 9, 2022

सांदणं..... कोकणातील एक पारंपारिक पदार्थ

           कोणत्याही प्रदेशाची खाद्य संस्कृती ही तिथे नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या वनस्पतींवर अवलंबून असते. त्यातूनच मग एका वनस्पती अथवा फळापासून अनेक पदार्थ विकसित झालेले आपण पाहतो. यात पदार्थांमधील वैविध्याच्या बरोबरीने नाशिवंत वस्तूंची साठवणूक हाही हेतू असतो. जसं, आंब्यापासून आमरस, आंबावडी, आंबापोळी, लोणचं, मुरंबे, इत्यादी. 

हीच गोष्ट ऊस, नारळ,फणस, कोकम, द्राक्ष अशा प्रत्येक नाशिवंत फळाला ( वा भाजी / वनस्पतीला ) लागू होते. याच विचारातून कोकणात फणसापासून बनवला जाणारा एक अतिशय चविष्ट पदार्थ म्हणजे सांदणं

खरंतर बहुतांश लोकांना आंब्या सारखे फणसात देखील प्रकार असतात हे माहीत नसतं. होय, फणसामध्ये कापाबरका हे दोन प्रकार असतात जे दोन वेगळ्या झाडांवर उगवतात. नावाप्रमाणे कापा हा सुरीने कापून त्याचे गरे सुट्टे करावे लागतात तर बरका हा हाताने फाडता येतो. ( आणि म्हणून तो माकडांचा आवडता नाश्ता असतो 😅) 
     बरका फणसाचे गरे बुळबुळीत व रसरशीत असतात. ( हात न माखवता खाणं impossible !!! 😋 ) याच गऱ्यांपासून सांदणं बनवली जातात. बनवायला फार अवघड नाहीत. बरका फणासाच्या गरे व अठीळ्या ( फणसाच्या बिया / बाठ ) वेगळ्या करायच्या. गरे मुळातच मऊ व बुळबुळीत असतात पण एकजीव व्हावेत म्हणून एकदा मिक्सर मध्ये वाटून घ्यायचे. त्यानंतर त्यात साधा रवा व गूळ घालून फेटायचे. दहा - पंधरा मिनिटे मिश्रण भिजू द्यायचे आणि मग धोकळ्याला करतो त्याप्रमाणे वाफवून घ्यायचे. वड्या पाडल्या की सांदणं तयार !!

करायला सोपे आणि चवीला 
                          "  क म्मा ल  "
                                      लागतात !!!              त्यामुळे बरका फणस मिळाला की नक्की करून पहा !!!

No comments:

Post a Comment

माणदेशी माणसं 🤎

कोणत्या प्रकारची पुस्तके वाचायला आवडतात? या प्रश्नाची जी अनेक उत्तरे मला देता येतील त्यातील एक म्हणजे व्यक्तिचित्रे.  महापुरुषांच्या, थोरामो...